व्हॉटसअॅप सिक्युरिटी August 24, 2017 apps. appchi duniya , अॅपची दुनिया व्हॉटसअॅप सिक्युरिटी गुड मॉर्निंगनं सुरू होणारा आपला मोबाइल रात्री झोपताना गुड नाइट होईपर्यंत संपत नाही. मोबाइल, इंटरनेट, सोशल नेटवर्किंगवरची अकाउंट हे सगळं वापरण्याची प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असली, तरी सध्या सर्वांना सतावणारी एक समान समस्या म्हणजे वैयक्तिक माहितीची सुरक्षितता.फेसबुक, ईमेल अकाउंट हॅक होणं आपल्याला माहीत होतं. काहींनी अनुभवही घेतला होता; पण आता व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक होण्याचे प्रकार समोर आले आहेत. यामुळे आपल्या फोनमधील वैयक्तिक माहिती इतरांच्या हाती लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. व्हॉट्सअॅप म्हणजे थेट मोबाइलशी संबंध आल्यामुळे त्याविषयीची काळजी वाटणं साहजिक आहे. व्हॉट्सअॅप म्हणजे थेट मोबाइलवर हा हल्ला आहे. ही काळजी करण्याची गोष्ट असली, तरी घाबरून जाण्याचं कारण नाही. काही छोट्या गोष्टींची काळजी घेतल्यास आपलं व्हॉट्सअॅप अकाउंट सुरक्षित राहू शकत... त्यासाठी काय करायचं तर....... व्हॉटसअॅप सेटिंगमध्ये सिक्युरिटी ऑप्शन त्यात टू स्टेप्स व्हेरिफिकेशनमध्ये जाऊन सिक्स डिजिट पिन नंबर ठेवणं व दुसरी स्टेप आहे तुमचं अकाउंट तुमच्या ईमेल अकाउंटशी जोडणं हा सहा आकडी पासवर्ड इतर कोणालाही न सांगणं....व्हॉटसअॅप हॅक करण्याचा प्रयत्न झाल्यास हा सहा आकडी पिन विचारला जाईल. म्हणूनच तो सेट करून ठेवणं गरजेचं आहे.... अशा प्रकारे तुम्ही तुमचं व्हॉट्सअॅप अकाउंट सुरक्षित ठेवू शकता तसेच कोणताही फोटो, लिंक, वेगळ्या क्रमांकांवरून येणारे मेसेज, त्यातल्या काहीतरी डाउनलोड करण्याच्या रिक्वेस्ट या सगळ्या गोष्टी फॉरवर्ड न करता ‘डिलिट’ करण्याची खबरदारी घ्यायची आहे. अननोन नंबरहून आलेली कोणतीही लिंक ओपन करू नका.मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईकांकडून तुमच्या अकाउंटसंबंधी किंवा इतर कुठल्या लिंकची विचारणा करणारा मेसेज आल्यास थेट त्यांच्याशी बोलून खात्री करा. व्हॉटसअॅप सिक्युरिटी गुड मॉर्निंगनं सुरू होणारा आपला मोबाइल रात्री झोपताना गुड नाइट होईपर्यंत संपत नाही . मोबाइल , इंटरनेट... Read more »
यूट्यूब गो August 24, 2017 apps. appchi duniya , अॅपची दुनिया यूट्यूब गो माणसाच्या प्रमुख गरजा म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा आणि तरुणाईची प्रमुख गरज म्हणजे फक्त आणि फक्त मोबईल अस झालाय.... १९८३ साली पहिला मोबाईल फोन बाजारात आला आणि आज सर्वाच्या जीवनात महत्त्वाचे स्थान मिळवून बसला. आजची तरुणाई ज्या पद्धतीने स्मार्टफोन वापरते, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यालाच चिकटलेली असते.... स्मार्ट फोन मधील सोशल नेटवर्किंग अॅप्स तर तरुणाईचे शाळा, घर , कॉलेज, युनिवर्सिटी सर्व काही झाले आहे या सोशल नेटवर्क अॅप्सबरोबर आणखी एक अॅप्स तरुणाईचे ताईत आहे ते म्हणजे यूट्यूब सगळे नवीन ट्रेंडीग व्हिडिओ, नवीन फिल्म ट्रेलर, नवीन, जुनी गाणी , वेब सिरीज, विविध शैक्षणिक व्हिडिओ, ट्युटोरिअल, नवीन माहिती या सर्वासाठी लागणारे एकमेव अॅप म्हणजे यूट्यूब..........पण स्लो नेटवर्कमध्ये ते अडकत चालत होते म्हणून कंटाळा येत होता पण आता तुमच्यासाठी एक गुडन्युज आहे कारण टेक कंपनी गूगल ने आता यूट्यूब गो या बीटा वर्जन एक नवीन अॅप्लिकेशन लॉन्च केले आहे....तर पाहूया काय आहे या अॅप्लिकेशनमध्ये हे अॅप भारतीय नेटवर्कचा विचार करून तयार केले असून ते स्लो नेटवर्कमधेही चांगल्याप्रकारे चालणार आहे. यूट्यूब गो अॅप मध्ये होम पेजवर ट्रेंडीग व्हिडिओ दिसणार आहेत. तसेच ज्या चॅनेलला सबक्राइब केले आहेत तेच व्हिडिओ दिसणार आहेत. व्हिडिओ बघण्याच्या अगोदर आपण त्याचा प्रिव्ह्यू पाहू शकणार आहोत. त्यानंतर तो ऑफलाईन सेव करू शकणार आहे तसेच सेव केलेले व्हिडिओ मित्राला सेंड सुद्धा करता येणार आहे. तसेच व्हिडिओ कोणत्या रेजोल्यूशन सेव करता ते आपण ठरवू शकणार आहे म्हणजे आपल्या भारतीय प्रेक्षकाना लक्षात घेऊन टेक कंपनी गूगल ने आता यूट्यूब गो नवीन हे अॅप्लिकेशन लॉन्च केले आहे.... यूट्यूब गो माणसाच्या प्रमुख गरजा म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा आणि तरुणाईची प्रमुख गरज म्हणजे फक्त आणि फक्त मोबईल अस झालाय.... १९८३ सा... Read more »
August 23, 2017 apps. appchi duniya [youtube src="lOtTlwCcgr4"/] [youtube src="lOtTlwCcgr4"/] Read more »
वेब सिरीज August 23, 2017 apps. appchi duniya , अॅपची दुनिया गो सोलो ........! अस म्हणत आजची तरुणाई गुगललाच आपला गुरु मनात आहे.......... आजच्या तरुणाईची “सोशल नेटवर्क घर आणि गुगल विद्यापीठ झालयं” अस म्हणायला हरकत नाही. आजच्या काळात इंटरनेटमध्ये खूपच सुधारणा झाल्या आहेत. इंटरनेटच्या गतीत खूप प्रगती झालीयं 4Gनेटवर्क, उच्च क्षमतेचे ब्रॉडबँड यामुळे व्हिडीओ स्ट्रीमिंग करणे खूपच सोपे झाले आहे म्हणून आजची तरुणाईमध्ये यू ट्यूबचा वापर दिवसेंदिवस खूपच वाढलेला आहे. पण ज्यावेळी हि तरुणाई घरी असते त्यावेळी सासूचे चार दिवसच सांगून ते हजारांच्याही पलीकडे नेणे किंवा अगदी चावून चोथा झालेल्या विषयांवरील टीव्ही मालिका या सर्व कारणांमुळे घरातील तरुण मंडळीचं त्यांच्या घरातच दररोज संध्याकाळी सहा ते दहा मानसिक शोषण होतं; पण सांगणार कुणाला, करणार काय! अशा वेळी चार तास आपापले मोबाईल काढून सोशल साइट्सवर रमणे हा एक पर्याय सोशिक तरुण मंडळींकडे असतो.........आणि त्यात काही तरुणांनी त्यावर आणखी एक मार्ग काढलाय ती मंडळी टीव्हीसमोर बसून सासू-सुनांच्या ड्रामेबाज मालिका बघत डोळे पुसणाऱ्या कुटुंबियांकडे दुर्लक्ष करून धमाल “वेब सीरिज” बघते...... टीव्ही मालिकांच्या रूक्ष, एकसुरी रखरखीत वाळवंटाच्या गावात ‘दुष्काळ पडलेल्या भागातीतील गावकऱ्यांप्रमाणे आम्ही तरुण मंडळी आकाशाकडे डोळे लावून होतो. टीव्ही मालिकेच्या शुष्क वाळवंटात आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या आम्हा तरुण गावकऱ्यांसाठी वरुणदेव धावून आला.हो ते आलेत.. आम्ही पाहिलं.. (आम्हीही त्यांना पाहिलं) आणि ते जिंकलेत...... जिंकताहेत.......... त्या लाइफ सेव्हर गोष्टीचं नाव म्हणजे वेब सीरिज.......! १९९५ मध्ये पहिली वेबसिरीज चालू झाली पण वेब सिरीज ची लोकप्रियता वाढली ती २०१४-१६ या कालावधीतच. वेब सिरीजचे सगळ्यात महत्वाचे वैशिट्य म्हणजे ती डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट, टीव्ही आणि स्मार्टफोन यासारख्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर पाहता येते. टीव्ही वा चित्रपटात संवादाच्या भाषेचा स्तर वापरताना, दृश्य दाखवताना सेन्सॉर बोर्डाची टांगती कात्री डोईवर सतत असते. त्यामुळे मनाप्रमाणे हवं ते आणि प्रेक्षकांनाही हवंच असतं ते दाखवता, बघता येत नाही. म्हणून नेहमीप्रमाणे साचेबद्ध संवाद, चोथा झालेले विषय, ‘आणि कसं असतं ना.’ अशी सतत वाक्यं अंगावर टाकावी लागतात. जी तरुण प्रेक्षकांच्या अंगावर येतात, डोक्यात जातात; पण वेबसीरिज या यू टय़ूबवर किंवा त्यांच्या अॅपवर असल्या कारणाने तिथे सेन्सॉरची कात्री नसल्याने बोल्ड संवाद, शिव्या यापासून ‘पहलाज’ . परहेज करावा लागत नाही. हे सारे पदार्थ वेब सीरिजमध्ये मोकळेपणाने वाढलेले असता प्रेक्षक त्याचा मनापासून आस्वाद घेतात. याशिवाय शिवाय तीस मिनिटांच्या एपिसोडमध्ये दहा मिनिटांचा ब्रेक, जाहिराती हा मनस्ताप वेब सीरिजमध्ये नसतो. इथे सासूचे चार दिवस चार हजार न होता खरंच चार ते पाचच असतात. त्यामुळे थोडक्यात मजा होते. वेब सीरिजचे जास्तीत जास्त पाच ते सात एपिसोड्स असतात; पण या सगळ्यात जमेची बाजू म्हणजे निरनिराळ्या, नाजूक, जड विषयांना हात घालून मालिका तयार केली जाते, जी प्रेक्षकांच्या हृदयाला नक्कीच हात घालते, स्पर्श करते. यामुळे वेब सीरिजचं प्रस्थ, क्रेज वाढतेय...... टीव्ही मालिकांच्या तुलनेत अत्यंत कमी खर्चात तयार होणारी वेब सिरीज खूपच प्रभावी आहे. कारण वेब सीरिज बघताना एक गोष्ट स्पष्ट जाणवते की, प्रचंड टॅलेंट असलेले कलाकार आपल्याकडे आहेत. ते आता स्वत:चा मार्ग स्वत: तयार करून त्यावर मार्गक्रमणा करीत यशस्वी होताहेत. आणि इथेच इंटरनेट सीरिज हा वेगळा प्लॅटफॉर्म ठरतो. तो प्रेक्षकांनाही भावतो. म्हणून येत्या काळात वेब सीरिजची क्रेझ वाढणार हे नक्की! सध्या भारतातमध्ये ‘पर्मनंट रूममेट्स’, ‘लिटल थिंग्स’, ‘ट्रिपिलग’, ‘लव बाइट्स’, ‘आयेशा’ या काही हिट आणि लोकप्रिय मालिका आहेत. त्यामध्ये पर्मनंट रूममेट्स ही गोष्ट आहे एका तरुण जोडप्याची. ते तीन वर्षांपासून लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहेत आणि त्यापूर्वी १५ दिवसच त्यांनी सोबत घालवले आहेत. तर लिटल थिंग्स मध्ये एक लव्ह स्टोरी आहे त्यामध्ये काव्या आणि ध्रुवची ते दोघे मुंबईमध्ये राहतात. लव्ह बाईट मध्ये लिव्ह इन रिलेशनशिप वर आधारित स्टोरी आहे. थोडक्यात काय..... तर वेब सीरिज यू टय़ूबवर किंवा त्यांच्या अॅपवर असल्याने तिथे सेन्सॉरची कात्री नसल्याने बोल्ड संवाद, शिव्या या साऱ्याचा तरुण प्रेक्षक मनापासून आस्वाद घेताना दिसतात. गो सोलो ........! अस म्हणत आजची तरुणाई गुगललाच आपला गुरु मनात आहे.......... आजच्या तरुणाईची “सोशल नेटवर्क घर आणि गुगल विद्यापीठ झालयं” अ... Read more »
मोबाईलमध्ये कॅरी करा आपले आधारकार्ड August 23, 2017 apps. appchi duniya , अॅपची दुनिया मोबाईलमध्ये कॅरी करा आपले आधारकार्ड सरकारने डिजीटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी mAadhaar अॅप लॉन्च केले आहे. हे अॅप अँड्रॉईड प्लॅटफॉर्मवर चालणार आहे. अॅप डाऊनलोड केल्यानंतर युजर्सला पेपर फॉर्मेटमध्ये आधारकार्ड कॅरी करण्याची गरज नाही. या अॅपला UIDAI (युनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) ने तयार केले आहे. अॅपमध्ये युजर्स नेम, जन्मतारीख, लिंग, पत्ता, फोटो आणि आधार नंबर लिंक असेल. त्यासाठी काय कराचे आहे तर या mAadhaar अॅपला गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करायचे आहे. लवकरच हे अॅप अॅपलच्या iOS वर्जनपण लॉन्च करण्यात येणार आहे. या अॅपचा वापर करण्यासाठी युजर्सला रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. तुमच्याकडे नंबर रजिस्टर्ड नाही तर जवळच्या आधार कार्ड नोंदणी केंद्रात जाऊन युजर्सने नोंदणी करावी लागणार आहे. पर्सनल डाटा सुरक्षित राहण्यासाठी अॅपमध्ये बायोमॅट्रीक लॉकिंग आणि अनलॉकिंग सिस्टम देण्यात आली आहे. अॅपमध्ये OTP सिस्टिम देण्यात आली आहे. यात ऑटोमॅटिकली टेम्पररी पासवर्ड जनरेट करण्यात येणार आहे. या अॅपद्वारे तुम्ही तुमचे प्रोफाईलपण अपडेट करू शकणार आहात. या अॅपनंतर युजर्सला आधारकार्डची हार्ड कॉपी आपल्यासोबत ठेवण्याची गरज नाही. मोबाईलमध्ये कॅरी करा आपले आधारकार्ड सरकारने डिजीटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी mAadhaar अॅप लॉन्च केले आहे . हे अ... Read more »
आले.......! अमेझॉनचे ‘अॅनिटाईम’ मॅसेंजर August 23, 2017 apps. appchi duniya , अॅपची दुनिया आले.......! अमेझॉनचे ‘अॅनिटाईम’ मॅसेंजर सध्याचे युग मॅसेंजरचे आहे असे म्हटल्यास फारसे वावगे ठरणार नाही व्हाटसअॅप, फेसबुक मॅसेंजर, व्हायबर, हाईक, टेलिग्राम, आय मॅसेज, अॅलो आदी मॅसेंजर्सला जगभरात मोठ्या प्रमाणात लोकप्रियता लाभली आहे. या पार्श्वभूमिवर आता अमेझॉन कंपनीदेखील मॅसेंजर लाँच करणार असल्याची माहिती समोर आली आहे.ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन लवकरच इंस्टेंट मॅसेजिंग अॅप आणणार आहे. कंपनीने आपलं नवं इंस्टेंट मॅसेजिंग अॅप अॅनिटाईम घेऊन येणार आहे. ज्यामुळे व्हॉट्सअॅप आणि फेसबूक मॅसेंजर सारखे अॅप्सला पर्याय देणार आहे.अॅमेझॉनचा अॅनिटाईम अॅप आयओएस, अँड्राईड आणि डेस्कटॉप तिघांना सपोर्ट करणार आहे. सध्या हे अॅप टेस्टिंगमध्ये आहे आणि लवकरच लॉन्च केलं जाणार आहे. अमेझॉनच्या मॅसेंजरमध्ये सर्व अत्यावश्यक फिचर्स असतील. अर्थात यात वैयक्तीक चॅटींग आणि सामुदायीक ग्रुप्समध्ये संदेश/प्रतिमा/व्हिडीओ आदींची देवाण-घेवाण करता येईल. तसेच यासोबत इमोजी, जीआयएफ आणि स्टीकर्स शेअरिंगचे पर्यायदेखील राहतील. हे मॅसेंजर अँड्रॉइड, आयओएस आणि वेब या तिन्ही प्लॅटफॉर्मवर काम करेल. व्हिडीओ आणि प्रतिमांना सुशोभित करण्यासाठी यात अत्यंत आकर्षक असे फिल्टर्स देण्यात येतील. तर यावरून उच्च दर्जाचे ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलही करण्यात येतील. याशिवाय यात लोकेशन शेअरिंग, गेमींग, बिझनेस चॅट, कस्टमाईज्ड चॅटींग आदी विशेष फिचर्सदेखील असतील असे यात नमूद करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांमध्ये अमेझॉनचे एनीटाईम हे मॅसेंजर लाँच करण्यात येईल अशी शक्यता आहे. एंड-टू-एंड एनक्रिप्शनचे कवच लाभलेल्या या मॅसेंजरमध्ये मोबाईल क्रमांकाने नव्हे तर अमेझॉनच्या अकाऊंटने लॉगीन करण्याची सुुविधा असण्याची शक्यता आहे. या अॅपचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही व्यक्तीसोबत बोलत असतांना तुमचा नंबर त्यावर दिसणार नाही. व्हॉट्सअॅप किंवा इतर अॅपमध्ये मात्र तुमचा नंबर दुसऱ्याला कळतो. आले.......! अमेझॉनचे ‘अॅनिटाईम’ मॅसेंजर सध्याचे युग मॅसेंजरचे आहे असे म्हटल्यास फारसे वावगे ठरणार नाही व्हाटसअ ॅप , फेसबुक ... Read more »