वेब सिरीज

गो सोलो ........! अस म्हणत आजची तरुणाई गुगललाच आपला गुरु मनात आहे.......... आजच्या तरुणाईची “सोशल नेटवर्क घर आणि गुगल विद्यापीठ झालयं” अस म्हणायला हरकत नाही.  आजच्या काळात  इंटरनेटमध्ये खूपच सुधारणा झाल्या आहेत. इंटरनेटच्या गतीत खूप प्रगती झालीयं 4Gनेटवर्क, उच्च क्षमतेचे ब्रॉडबँड यामुळे व्हिडीओ स्ट्रीमिंग करणे खूपच सोपे झाले आहे म्हणून आजची तरुणाईमध्ये  यू ट्यूबचा  वापर दिवसेंदिवस खूपच वाढलेला आहे.  पण ज्यावेळी हि तरुणाई घरी असते त्यावेळी सासूचे चार दिवसच सांगून ते हजारांच्याही पलीकडे नेणे किंवा अगदी चावून चोथा झालेल्या विषयांवरील टीव्ही मालिका या सर्व कारणांमुळे घरातील तरुण मंडळीचं त्यांच्या घरातच दररोज संध्याकाळी सहा ते दहा मानसिक शोषण होतं; पण सांगणार कुणाला, करणार काय! अशा वेळी चार तास आपापले मोबाईल काढून सोशल साइट्सवर रमणे हा एक पर्याय सोशिक तरुण मंडळींकडे असतो.........आणि त्यात काही तरुणांनी त्यावर आणखी एक मार्ग काढलाय ती मंडळी टीव्हीसमोर बसून सासू-सुनांच्या ड्रामेबाज मालिका बघत डोळे पुसणाऱ्या कुटुंबियांकडे दुर्लक्ष करून  धमाल “वेब सीरिज” बघते......
       टीव्ही मालिकांच्या रूक्ष, एकसुरी रखरखीत वाळवंटाच्या गावात ‘दुष्काळ पडलेल्या भागातीतील गावकऱ्यांप्रमाणे आम्ही तरुण मंडळी आकाशाकडे डोळे लावून होतो. टीव्ही मालिकेच्या शुष्क वाळवंटात आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या आम्हा तरुण गावकऱ्यांसाठी वरुणदेव धावून आला.हो ते आलेत.. आम्ही पाहिलं.. (आम्हीही त्यांना पाहिलं) आणि ते जिंकलेत...... जिंकताहेत.......... त्या लाइफ सेव्हर गोष्टीचं नाव म्हणजे वेब सीरिज.......!
१९९५ मध्ये पहिली वेबसिरीज चालू झाली पण वेब सिरीज ची लोकप्रियता  वाढली ती २०१४-१६ या कालावधीतच. वेब सिरीजचे सगळ्यात महत्वाचे वैशिट्य म्हणजे ती  डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट, टीव्ही आणि स्मार्टफोन यासारख्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर पाहता येते. टीव्ही वा चित्रपटात संवादाच्या भाषेचा स्तर वापरताना, दृश्य दाखवताना सेन्सॉर बोर्डाची टांगती कात्री डोईवर सतत असते. त्यामुळे मनाप्रमाणे हवं ते आणि प्रेक्षकांनाही हवंच असतं ते दाखवता, बघता येत नाही. म्हणून नेहमीप्रमाणे साचेबद्ध संवाद, चोथा झालेले विषय, ‘आणि कसं असतं ना.’ अशी सतत वाक्यं अंगावर टाकावी लागतात. जी तरुण प्रेक्षकांच्या अंगावर येतात, डोक्यात जातात; पण वेबसीरिज या यू टूबवर किंवा त्यांच्या अॅपवर असल्या कारणाने तिथे सेन्सॉरची कात्री नसल्याने बोल्ड संवाद, शिव्या यापासून ‘पहलाज’ . परहेज करावा लागत नाही. हे सारे पदार्थ वेब सीरिजमध्ये मोकळेपणाने वाढलेले असता प्रेक्षक त्याचा मनापासून आस्वाद घेतात. याशिवाय शिवाय तीस मिनिटांच्या एपिसोडमध्ये दहा मिनिटांचा ब्रेक, जाहिराती हा मनस्ताप वेब सीरिजमध्ये नसतो. इथे सासूचे चार दिवस चार हजार न होता खरंच चार ते पाचच असतात. त्यामुळे थोडक्यात मजा होते. वेब सीरिजचे जास्तीत जास्त पाच ते सात एपिसोड्स असतात; पण या सगळ्यात जमेची बाजू म्हणजे निरनिराळ्या, नाजूक, जड विषयांना हात घालून मालिका तयार केली जाते, जी प्रेक्षकांच्या हृदयाला नक्कीच हात घालते, स्पर्श करते. यामुळे वेब सीरिजचं प्रस्थ, क्रेज वाढतेय......
टीव्ही मालिकांच्या तुलनेत अत्यंत कमी खर्चात तयार होणारी वेब सिरीज खूपच प्रभावी आहे. कारण वेब सीरिज बघताना एक गोष्ट स्पष्ट जाणवते की, प्रचंड टॅलेंट असलेले कलाकार आपल्याकडे आहेत. ते आता स्वत:चा मार्ग स्वत: तयार करून त्यावर मार्गक्रमणा करीत यशस्वी होताहेत. आणि इथेच इंटरनेट सीरिज हा वेगळा प्लॅटफॉर्म ठरतो. तो प्रेक्षकांनाही भावतो. म्हणून येत्या काळात वेब सीरिजची क्रेझ वाढणार हे नक्की!

सध्या भारतातमध्ये  पर्मनंट रूममेट्स’, ‘लिटल थिंग्स’, ‘ट्रिपिलग’, ‘लव बाइट्स’, ‘आयेशा’ या काही हिट आणि लोकप्रिय मालिका आहेत. त्यामध्ये पर्मनंट रूममेट्स ही गोष्ट आहे एका तरुण जोडप्याची. ते तीन वर्षांपासून लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहेत आणि त्यापूर्वी १५ दिवसच त्यांनी सोबत घालवले आहेत. तर लिटल थिंग्स मध्ये एक लव्ह स्टोरी आहे त्यामध्ये काव्या आणि ध्रुवची  ते दोघे मुंबईमध्ये राहतात. लव्ह बाईट मध्ये लिव्ह इन रिलेशनशिप वर आधारित स्टोरी आहे. थोडक्यात काय..... तर वेब सीरिज यू टूबवर किंवा त्यांच्या अॅपवर असल्याने तिथे सेन्सॉरची कात्री नसल्याने बोल्ड संवाद, शिव्या या साऱ्याचा तरुण प्रेक्षक मनापासून आस्वाद घेताना दिसतात.

Post a Comment

[blogger]

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.