जीएसटी अ‍ॅक्ट

जीएसटी अॅक्ट

1 जुलैला सकाळी उठल्यानंतर तुम्ही कॉफी पिणार असाल तर ती रोजच्या पेक्षा महाग झालेली असेल........कारण देशात 1 जुलैपासून जीएसटी कर प्रणाली लागू होणार आहे.जीएसटी लागू झाल्यानंतर देशभरात एकच कर प्रणाली असेल. त्यामुळे काही वस्तू स्वस्त होतील, तर काही वस्तू महागणार आहेत. देशात एक कर प्रणाली लागू झाल्यानंतर त्याचा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावरही होणार आहे. यामुळेच १ जुलैपासून लागू होणाऱ्या नवीन करप्रणालीची माहिती देणारे व व्यापाऱ्यांना भविष्यात करप्रणालीसाठी आवश्यक सेवा पुरविणाऱ्या अॅप्सची गर्दी अॅप बाजारात दिसू लागली. हि माहिती मराठीत मिळवण्यासाठी पण काही अॅप प्ले स्टोअर आली आहेत....
यामध्ये जर तुम्ही जीएसटी अॅक्ट हे अॅप घेतले तर हे तुम्ही पूर्णपणे ऑफलाईनही वापरू शकणार आहे.. या अॅपमध्ये GST (वस्तू आणि सेवा कर) आपल्याला GST कायद्याविषयी संपूर्ण माहिती मिळवू शकता. GST अमलात आणण्यामागे सरकारची काय भूमिका आहे. व्यापारी वर्गाला, शेतकरी वर्गाला, छोटया-मोठया उद्योगांना, राज्यांना GST मुळे काय फायदे व तोटे असतील याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. तसेच GST ची नोंदणी कशी करावी व त्यासाठी कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी तसेच आयटीसी (ITC - Input Tax Credit) काय आहे आणि त्याचे नियम कसे आहेत, कसे मिळवावे, मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी, ITC कोणत्या कोणत्या बाबीसाठी वापरता येणार नाही याबद्दल सविस्तर माहिती उपलब्ध करून दिली आहे. GST चे लेखापरीक्षण (audit) कसे होते आणि त्यासंबंधी कोणत्या कागदपपत्रांची पूर्तता करावी, लेखापरीक्षण कसे होते, कोणती व्यक्ती लेखापरीक्षण करते याचीही माहिती अँप मध्ये सविस्तर मिळेल.GST मध्ये कोणत्या प्रकारे कायद्याचे उल्लंघन होईल आणि त्यासाठी कोणती कारणे कारणीभूत ठरतील हेही अँप मध्ये मिळेल. नवीन करप्रणालीत व्यापाऱ्याला दरमहा किमान तीन म्हणजे वर्षांला बारा विवरणपत्रे सादर करावी लागणार आहेत. नव्या करप्रणालीची सर्व प्रक्रिया ऑनलाइन असल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांना या प्रक्रियेची चिंता वाटू लागली आहे. ही चिंता दूर करण्यासाठी विवरणपत्रे सादर करीत असताना नेमकी कोणती काळजी घ्यायची. ती कशी सादर करावयाची. याबाबतचा तपशील या अॅपमध्ये देण्यात आला आहे.


Post a Comment

[blogger]

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.