यूट्यूब गो

यूट्यूब गो
माणसाच्या प्रमुख गरजा म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा आणि तरुणाईची प्रमुख गरज म्हणजे फक्त आणि फक्त मोबईल अस झालाय.... १९८३ साली पहिला मोबाईल फोन बाजारात आला आणि आज सर्वाच्या जीवनात महत्त्वाचे स्थान मिळवून बसला. आजची तरुणाई ज्या पद्धतीने स्मार्टफोन वापरते, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यालाच चिकटलेली असते....
स्मार्ट फोन मधील सोशल नेटवर्किंग अॅप्स तर तरुणाईचे शाळा, घर , कॉलेज, युनिवर्सिटी सर्व काही झाले आहे या सोशल नेटवर्क अॅप्सबरोबर आणखी एक अॅप्स तरुणाईचे ताईत आहे ते म्हणजे यूट्यूब सगळे नवीन ट्रेंडीग व्हिडिओ, नवीन फिल्म ट्रेलर, नवीन, जुनी गाणी , वेब सिरीज, विविध शैक्षणिक व्हिडिओ, ट्युटोरिअल, नवीन माहिती या सर्वासाठी लागणारे एकमेव अॅप म्हणजे यूट्यूब..........पण स्लो नेटवर्कमध्ये ते अडकत चालत होते म्हणून कंटाळा येत होता पण आता तुमच्यासाठी एक गुडन्युज आहे कारण  टेक कंपनी गूगल ने आता यूट्यूब गो या बीटा वर्जन एक नवीन अॅप्लिकेशन लॉन्च केले आहे....तर पाहूया काय आहे या अॅप्लिकेशनमध्ये हे अॅप भारतीय नेटवर्कचा विचार करून तयार केले असून ते स्लो नेटवर्कमधेही चांगल्याप्रकारे चालणार आहे.

यूट्यूब गो अॅप मध्ये होम पेजवर ट्रेंडीग व्हिडिओ दिसणार आहेत. तसेच ज्या चॅनेलला सबक्राइब केले आहेत तेच  व्हिडिओ दिसणार आहेत. व्हिडिओ बघण्याच्या अगोदर आपण त्याचा प्रिव्ह्यू पाहू शकणार आहोत. त्यानंतर तो ऑफलाईन  सेव करू शकणार आहे तसेच सेव केलेले व्हिडिओ मित्राला सेंड सुद्धा करता येणार आहे. तसेच व्हिडिओ कोणत्या रेजोल्यूशन सेव करता ते आपण ठरवू शकणार आहे म्हणजे आपल्या भारतीय प्रेक्षकाना लक्षात घेऊन टेक कंपनी गूगल ने आता यूट्यूब गो नवीन हे अॅप्लिकेशन लॉन्च केले आहे....

Post a Comment

[blogger]

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.