शिक्षणपूरक अ‍ॅप्स

असा एकही लहान मुलगा नसेल की जो स्मार्टफोन वापरत नसेल. मग त्याने तो फोन वापरू नये यासाठी पालक खूप प्रयत्न करत असतात. पण जर मुलांनी या फोनचा वापर चांगल्या अ‍ॅप्ससाठी केला तर त्यांना ते उपयुक्त पण ठरू शकते. यामुळे बालदिनानिमित्त शाळकरी मुलांसाठी खास शैक्षणिक अ‍ॅप्सविषयी.
ग्राफिंग कॅलक्युलेटर –
सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या कॅलक्युलेटर्सपेक्षा अधिक सुविधा असलेले हे कॅलक्युलेटर आपल्याला साध्या हिशोबांबरोबरच वैज्ञानिक गणित सोडविण्यासाठीही उपयुक्त ठरते. या अ‍ॅपमधील कॅलक्युलेटरमध्ये वर्गमुळे, घन, नॅचरल लॉग, एनटीएच रूट, लॉग बेस १०, मूळ संख्या, पर्मिटेशन्स, कॉम्बिनेशन्स, मॉडयमुल्स, बेल कव्‍‌र्ह आदी गणिती प्रकार सोडविण्याचे पर्याय देण्यात आले आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना गणित सोप्या पद्धतीने समजावून घेणे आणि सोडविणे शक्य होणार आहे. यामध्ये आपल्याला विविध सांख्यिकीय आलेखही मांडता येतात. याशिवाय या अ‍ॅपमध्ये एरिया, अंतर, एनर्जी, शक्ती, मास, दाब, वेग, तापमान, वेळ आदी मापकांचे कन्व्‍‌र्हटरही देण्यात आले आहेत.
कोणत्या ‘ओएस’वर उपलब्ध – हे अ‍ॅप आयओएस ६.० किंवा त्या पुढच्या ओएसवर काम करते. तर अँड्रॉइडच्या २.१ आणि त्याच्या वरच्या व्हर्जनवर वापरता येणार आहे.
इंटरॅक्टिव्ह विज्ञान संग्रह
जीवशास्त्रशी संबंधित १००हून अधिक संज्ञा आणि संकल्पना या अ‍ॅपमध्ये आपल्याला देण्यात आल्या आहेत. यातील काही संकल्पनांचे छानसे व्हिडीओजही देण्यात आले आहेत. यातील बरीचशी माहिती आपल्याला फ्लॅशच्या मदतीने सांगण्यात आली आहे. यात मानवी शरीर, वातावरण, पेशी असे विविध विभाग करण्यात आले आहेत. हे अ‍ॅप माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरू शकणार आहे. यामध्ये प्रश्नावलीही आहे. हे अ‍ॅप वापरण्यासाठी आपल्याकडे थ्रीजी किंवा वाय-फायची जोडणी आवश्यक आहे. यातील शब्द शोधण्यासाठी सर्चचा पर्यायही यात देण्यात आला आहे.
कोणत्या ओएसवर उपलब्ध- हे अ‍ॅप आयओएस ५.० किंवा त्या पुढच्या ओएसवर काम करते.
किंमत – मोफत
लिंक्स – अ‍ॅपल – https://itunes.apple.com/US/app/id792913964mt=8
कायम्बू
हे अ‍ॅप शिक्षकांना उपयुक्त असून विद्यर्थ्यांच्या विकासासाठी यामध्ये अनेक गोष्टी देण्यात आल्या आहेत. याचबरोबर विद्यार्थ्यांशी नाते कशाप्रकारे अधिक चांगले करता येईल याही बाबतीत काही टीप्स या अ‍ॅपमध्ये देण्यात आल्या आहे. यामध्ये कॅमेराचा वापर करून तयार केलेल्या फाइल्स शेअर करणे, हाताने लिहिलेल्या नोटसचे छायाचित्र काढून ते ई-मेलद्वारे पाठविणे या अ‍ॅपच्या माध्यमातून अगदी सोपे होते. या अ‍ॅपमध्ये दिलेल्या विविध निकषांच्या आधारे पालकांशी संवाद साधून विद्यार्थ्यांचा अभ्यास करून शिक्षक एखाद्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण अभ्यास करू शकतात. ज्याचा वापर त्यातील उणिवा भरून काढण्यासाठी होऊ  शकतो.
कोणत्या ओएसवर उपलब्ध- हे अ‍ॅप आयओएस ५.१ किंवा त्या पुढच्या ओएसवर काम करते.
किंमत – मोफत
लिंक्स – अ‍ॅपल – https://itunes.apple.com/US/app/id625387758mt=8
लुमिबुक
लुमिबुक हे पुस्तके वाचण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. या अ‍ॅपमध्ये आपल्याला आपल्या आवडीच्या लेखकांच्या पुस्तकांचे अपडेटस सातत्याने येत असतात. इतकेच नव्हे तर यामध्ये विविध विषयांना वाहिलेले गटही तयार करण्यात आले आहेत. यातील आपल्या आवडीच्या गटात सहभागी होऊन आपण चर्चेतही सहभागी होऊ  शकतो. हे अ‍ॅप ऑनलाइन क्लाऊडवर आधारित असल्यामुळे आपल्या फोनची मेमरीही कमी खर्च होते. याचबरोबर आपल्याला यामध्ये माहिती सातत्याने मिळत राहते. पुस्तकाची नवी आवृत्ती आल्यास आपल्याला ती विकत घ्यावयाची गरज पडत नाही.
कोणत्या ओएसवर उपलब्ध- हे अ‍ॅप आयओएस ५.० किंवा त्या पुढच्या ओएसवर काम करते.
किंमत – मोफत
लिंक्स – अ‍ॅपल – https://itunes.apple.com/us/app/lumibook /id787534889mt=8
नासा
नासा या अमेरिकी अंतराळ संस्थेने अंतराळातील विविध विषयांची माहिती देणारे अ‍ॅप तयार केले आहे. यामध्ये छायाचित्रे, व्हिडीओज, माहिती, बातम्या, लेख, ट्विट, नासा टीव्ही अशा विविध गोष्टी आपल्याला देण्यात आल्या आहेत. यामध्ये नासाच्या विविध मोहिमांचे अपडेट्स आपल्याला सातत्याने येत असतात. अ‍ॅपमध्ये १२ हजारांहून अधिक छायाचित्रे देण्यात आली आहे. विविध विषयांचे व्हिडीओज असून ते आपल्याला मागणीनुसार उपलब्ध करून दिले जातात. नासाच्या विविध मोहिमांच्या वेळी नासा टीव्ही माध्यमातून आपण त्याचे थेट प्रक्षेपणही पाहू शकतो.
कोणत्या ओएसवर उपलब्ध- हे अ‍ॅप आयओएस ५.० किंवा त्या पुढच्या ओएसवर काम करते, तर अँड्रॉइडच्या २.१ आणि त्याच्या वरच्या व्हर्जनवर वापरता येणार आहे.
किंमत – मोफत
लिंक्स – अ‍ॅपल – https://itunes.apple.com/us/app/nasa-app/id334325516mt=8
अँड्रॉइड- https://play.google.com/store/apps/detailsid=gov.nasa
ओली सेफ ब्राऊझर
आपल्या मुलांनी वाईट विचारांची किंवा फोनोग्राफीची संकेतस्थळे पाहू नयेत यासाठी आपण इंटरनेटवर संकेतस्थळे ब्लॉक करून ठेवतो, मात्र मोबाइलवर हे आपल्याला करणे शक्य नसते. यामुळे यासाठी ओली सेफ ब्राऊझर तयार करण्यात आले आहे. या ब्राऊझरच्या माध्यमातून आपल्याला सुरक्षित ब्राऊझिंग करता येते. यामध्ये ७००हून अधिक संकेतस्थळे बंद करण्यात आली आहेत. यातील ब्लॉक लिस्ट आपण आपल्या सोयीने बदलूही शकतो. इतकेच नव्हे तर इंटरनेटचा वापर किती केला याचा हिशेबही या माध्यमातून आपल्याला ठेवता येऊ  शकतो. ज्यांना आपल्या ब्राऊझिंगची हिस्ट्री कुणासाठी खुली करावयाची नसेल त्यांनी हिस्ट्रीला पासवर्डही देता येणार आहे.
कोणत्या ओएसवर उपलब्ध- हे अ‍ॅप आयओएस ६.० किंवा त्या पुढच्या ओएसवर काम करते.
किंमत – मोफत
लिंक्स – अ‍ॅपल – https://itunes.apple.com/app/id794307955
टेड
नव संशोधकांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘टेड’चे हे अ‍ॅप असून यामध्ये आपल्याला जगभरातील संशोधकांची माहिती, त्यांचे व्हिडीओज पाहता येणार आहे. यामध्ये तंत्रज्ञानातील गोष्टी तज्ज्ञ तसेच वैद्यक आणि व्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञांचे व्हिडीओजही पाहता येणार आहेत. यामध्ये टेडमध्ये झालेल्या तब्बल १४००हून अधिक व्याख्यानांच्या व्हिडीओजचा संग्रह आहे. यात आपल्याला ९० भाषांमध्ये माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये आपण मागणीनुसारही विविध व्याख्याने ऐकू शकतो.
कोणत्या ओएसवर उपलब्ध- हे अ‍ॅप आयओएस ६.१ किंवा त्या पुढच्या ओएसवर काम करते, तर अँड्रॉइडच्या २.१ आणि त्याच्या वरच्या व्हर्जनवर वापरता येणार आहे.
किंमत – मोफत
लिंक्स – अ‍ॅपल – https://itunes.apple.com/us/app /ted/id376183339mt=8
अँड्रॉइड – https://play.google.com/store apps/detailsid=com.ted.android
नीरज पंडित @nirajcpandit
This is the most recent post.
Older Post

Post a Comment

[blogger]

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.