रांगोळी ‘अॅप’वाली

रांगोळीअॅप’वाली
भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला विशेष महत्त्व आहे. सण समारंभावेळी विविध रंगसंगती असलेल्या देखण्या रांगोळ्या काढल्या जातात. रांगोळीच्या डिझाईन्सची विविध पुस्तके बाजारात उपलब्ध असली तरी आता हातातल्या स्मार्टफोनमधील अॅप्सही रांगोळीच्या डिझाईनसाठी उपयुक्त ठरणार आहेत. रांगोळीच्या वेगवेगळ्या डिझाईनची ही अॅप्स महिलांमधील कलेला वाव देणारी ठरत आहेत.बाजारात रांगोळीचे रेडीमेड छाप मिळत असले तरी हाताने काढलेल्या आखीव रेखीव रांगोळीचा आनंद वेगळाच असतो. रांगोळीच्या अशाच काही अॅप्समध्ये आकर्षक कलाकुसर केलेल्या रांगोळ्यांच्या कलाकृती असून, वेगवेगळ्या प्रांतात काढण्यात येणाऱ्या वैविध्यपूर्ण रांगोळीची माहितीही यामध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे ही अॅप्स रांगोळीची आवड असणाऱ्या महिलांसाठी सण-उत्सव आणि समारंभांच्या काळात फायदेशीर ठरणार आहेत.

गुगलच्या प्ले स्टोअरवर रांगोळी सर्च करताच रांगोळीची बरीच अॅप्स दिसतात. यामध्ये रांगोळी डिझाईन्स, टॉप रांगोळी, फेस्टिवल रांगोळी मेकिंग, बेस्ट इंडियन रांगोळी, लेटेस्ट रांगोळी डिझाईन्स, रांगोळी फन, दिवाळी स्पेशल रांगोळी अशी अनेक अॅप्स उपलब्ध आहेत.
या अॅप्समध्ये रांगोळीची सचित्र माहिती असणाऱ्या अशा विविध अॅप्समध्ये भारताच्या विविध राज्यातील रांगोळीचे कलाप्रकार, तेथील रांगोळीचे महत्त्व, त्या त्या भागातील रांगोळीच्या डिझाईन्स, ठिपक्यांच्या रांगोळ्या, रांगोळी कशी काढावी याची माहिती, आकर्षक रंगसंगती असलेल्या डिझाईन तसेच वेगवेगळ्या आकारातील रांगोळ्यांचे वॉलपेपर यांचा समावेश करण्यात आला आहे.

Post a Comment

[blogger]

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.